आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांच्या मदतीची थकबाकी अाठ दिवसांत देणार : खडसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गारपीट आणि दुष्काळाने नुकसान झालेल्या राज्यातील बहुतांश शेतक-यांना सरकारच्या वतीने मदतीची रक्कम देण्यात अाली अाहे. तरीही अाणखी काही भरपाईची थकबाकी असल्यास ती येत्या अाठ दिवसांत शेतक-यांना दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

केंद्राने राज्यातील शेतक-यांना मदत म्हणून एकूण २२६९.२१ कोटी रुपयांचे अनुदान पाठवले अाहे. मात्र राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावामुळे ही रक्कम शेतक-यांपर्यंत पाेहाेचू शकलेली नाही, याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केले हाेते. त्यातबाबत विचारले असता खडसे म्हणाले की, ‘शेतक-यांचा एक पैसाही राज्य सरकार शिल्लक ठेवणार नाही. काही रक्कम शिल्लक आहे ती लवकरच दिली जाईल. ज्यांना रक्कम मिळाली नसेल त्यांनी तक्रार करावी. संबंधित अधिका-यांवर कारवाई करू, असा इशाराही खडसे यांनी दिला.