आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परराज्यातील शेतकऱ्यांनी केलाय कर्जमाफीसाठी अर्ज; घेतलाय राज्यात राहणाऱ्या नातलगांचा 'आधार'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कर्जमाफीसाठी चक्क उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणमधील शेतकऱ्यांनी अर्ज केल्याचे आता समोर आले आहे. हे शेतकरी इतर राज्यातले असले तरी नातेलगांच्या आधार कार्डावर पत्ता मुंबईचा असल्याने त्यांनी अर्ज केले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून ही माहिती उघड करण्यात आली आहे.
 
मुंबईतून असे जवळपास 14 हजार कर्जमाफीचे अर्ज आल्याचा तपशील माहिती तंत्रज्ञान विभागाकडून मिळाला आहे. हे कर्जमाफीचे अर्ज उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली, प्रतापगड तर कर्नाटकातल्या विजापूर, गुजरातमधल्या सुरत आणि तेलंगणमधल्या अदिलाबादच्या शेतकऱ्यांनी केले असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतले काही कथित शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे आता अशा अर्जांची नीट पडताळणी करुन राज्यातील पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल याची काळजी सरकारला घ्यावी लागणार आहे, असे म्हटले जाऊ लागले आहे. 
बातम्या आणखी आहेत...