आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांना मिळाली 562 कोटींची नुकसान भरपाई,राष्‍ट्रीय पीक विमा योजनेचा यंदा उच्चांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रब्बी पिक विमा योजनेत 13 लाख 31 हजार शेतक-यांनी भाग घेतला होता. त्या सर्व शेतक-यांना विमा कंपनीने नुकसान भरपाईचे नुकतेच वाटप केले असून भरपाईची एकूण रक्कम 562 कोटी 14 लाख आहे, अशी माहिती कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
राज्यात सुधारित राष्‍ट्रीय कृषी विमा योजना 1999-2000 पासून राबवण्यात येत आहे. यंदा खरीप हंगामासाठी 201 कोटी 43 लाखाची भरपाई देण्यात आली आहे. त्यात रब्बीच्या 562 कोटी भरपाईची भर पडल्यामुळे 2012-13 या एका वर्षाच्या पिक विमा भरपाईची रक्कम 763 कोटी 57 लाखांवर पोचली आहे. रब्बीसाठी 562 कोटीच्या रकमेत कोरडवाहू ज्वारीसाठी 290 कोटी, बागायती ज्वारीसाठी 102 कोटी तर हरभरा पिकासाठी 140 कोटीचा वाटा आहे. रब्बीची मुदत 15 जानेवारीपर्यंत असते. परंतु दुष्काळी परस्थितीमुळे या योजनेस यंदा 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती.
रब्बी हंगामातील पीकविमा योजनेत 10 लाख शेतक-यांनी सहभाग घेतला होता. शेतक-यांचा एकूण विमा हप्ता 123 कोटींचा होता. त्यातील केंद्र सरकारने 71 लाख, राज्य शासनाने 96 कोटी तर उर्वरित 26 कोटी रुपयांची रक्कम शेतक-यांनी भरली होती. पूर्वी ज्या शेतक-यांनी विमा उतरवला आहे, अशांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीच्या 60 टक्के भरपाई मिळत असे. यंदा पिक नुकसानीच्या 80 टक्के भरपाई देण्यात आली. त्यामुळे रब्बी विमा भरपाईच्या रकमेने उच्चांक गाठल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.