आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार क्रमांक नसल्याने कर्जमाफीच्या पावणेतीन लाख अर्जांची होणार पुन्हा छाननी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आधार क्रमांक नसल्याने कर्जमाफीसाठी आलेल्या 2 लाख 41 हजारांची पुन्हा छाननी होणार आहे. जवळपास 56 लाख 59 हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले आहेत. 
 
मुंबईतूनही अर्ज
मुंबई शहरातून 23 हजार 715 तर उपनगरांतून 1 हजार 620 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज केले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 3 लाख 34 हजार 920 शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज दिले आहेत. दरम्यान, कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती.
 
10 लाख बनावट शेतकरी?
दुसरीकडे, कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांमध्ये 80 लाख पात्र, तर 10 लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसेच, येत्या ऑक्‍टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिले होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...