आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी अाज चक्काजाम, शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला विद्यार्थी संघटनांचाही पाठिंबा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने १४ अाॅगस्ट राेजी राज्यभर चक्का जाम अांदाेलन करण्यात येणार अाहे. या अांदाेलनाला एसएफआय तसेच डीवायएफआय या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दिला अाहे. या संघटना विद्यापीठांवर मोर्चे काढून शेतकऱ्यांना तातडीने सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करणार आहेत.

राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार अाहे, अशी माहिती शेतकरी सुकाणू समितीचे नेते अजित नवले यांनी दिली. किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू तसेच शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या संघटना, आमदार जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष तसेच किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे हे चक्का जाम आंदोलनात  पुढे असतील.
 
बातम्या आणखी आहेत...