आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीची मागणी : मंत्रालयावर फेकले कांदे, तूर, केळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या अांदाेलन - Divya Marathi
मुंबईत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या अांदाेलन
मुंबई - तूर खरेदीची चिंता सतावत असतानाच अचानक गारपिटीचा फटका बसल्यामुळे पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी चहुबाजूने संकटात सापडला अाहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न साेडता कर्जमाफीबराेबरच शेतकऱ्यांकडील तुरीची पूर्ण खरेदी करावी, शेतमालाला याेग्य हमीभाव मिळावा या मागणीसाठी बळीराजा संघटनेच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी मंगळवारी   मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमाेर जाेरदार अांदाेलन केले.   सरकारविराेधात घाेषणाबाजी करीत शेतकऱ्यांनी तुरीची डाळ, कांदे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर, रस्त्यावर फेकून  संताप व्यक्त केला.   
 
कर्जमाफी देण्याबाबत राज्य सरकारकडून सुरू असलेली चालढकल, थंडावलेली तूर खरेदी, शेतमालाला मिळत नसलेला भाव यामुळे शेतकरी अगाेदरच संकटात सापडला अाहे. त्यातच मागील अाठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले अाहेत. शेतकऱ्यांच्या या परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, संस्थापक पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर, सातारा येथून आलेल्या शेतकऱ्यांनी  दुपारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक जमून अचानक घाेषणा देण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा काेरा करावा, राज्यातील शिल्लक तूर खरेदी करून कर्नाटक राज्याप्रमाणे तुरीला प्रतिटन ४५० रुपये बाेनस द्यावा, तूर डाळीच्या घाेटाळ्याची सीअायडीमार्फत चाैकशी करा, अशा मागण्या या वेळी अांदाेलकांनी केल्या.   स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव द्यावा, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून तत्काळ भरपाई द्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या आवारात पंधरा मिनिटे गोंधळ घालत ठिय्या आंदोलन केले. अखेर पोलिसांनी या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.   
 
राजकीय पक्षांमध्ये अांदाेलनाची ‘स्पर्धा’  
शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि तुरीचा विषय सध्या गाजत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारला कोंडीत पकडण्याची खेळी विरोधकांनी खेळली, तर संघर्ष यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी सरकारने संवाद यात्रा सुरू केली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी रस्त्यात उतरून आंदोलन केले होते.
 
पुढील स्लाइडवर पाहा, अांदाेलनकर्त्यांचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...