आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Farmers Subsidy Missed 2269, But Sanction 200 Crores

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंत्रिमंडळाचा निर्णय: शेतक-यांचे थकले २२६९ कोटी, मंजूर दाेनशे कोटीच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दाैरा केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समस्या कानी घातल्या. - Divya Marathi
मराठवाड्यातील दुष्काळी भागाचा दाैरा केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन समस्या कानी घातल्या.
मुंबई - राज्य सरकारकडे दुष्काळ, खरीप पीक विम्यासह विविध योजनांअंतर्गतचे शेतक-यांचे २२६९ कोटी रुपयांचे अनुदान थकलेले असताना मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या नुकसान भरपाईपोटी केवळ २०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही रक्कम शेतक-यांना देय असलेल्या अनुदानाच्या १० टक्केही नाही.

राज्य सरकारकडे शेतक-यांचे खरीप पीक विमा योजनेचे १६०० कोटी, सिंचन साहित्य खरेदी अनुदानाचे १३४.७४ कोटी रुपये, दुष्काळापोटीचे ५३२ कोटी रुपये तर फळपीक विम्याचे २.४७ कोटी असे एकूण २२६९.२१ कोटी रुपयांचे अनुदान थकलेले आहे. असे असतानाही मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर्षीच्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना विशेष मदत म्हणून २०० कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मदत शेतक-यांना तातडीने वाटप करण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांकडे हा निधी देण्यात आला आहे. या निधीतून कोकण विभागाला ६९ कोटी ८५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असून प्रामुख्याने कोकणातील आपदग्रस्त आंबा आणि काजू उत्पादकांना ही शासकीय मदत दिली जाणार अाहे.

रब्बी हंगामातील पिके व फळपिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतक-यांना अर्थसहाय्य करण्यासाठी नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूरच्या विभागीय आयुक्तांना ३६४.२८ कोटी निधीचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानाची रक्कम कधी मिळणार याबाबत मात्र अनिश्चितता आहे.