आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मंत्रालयात विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नगर जिल्ह्यातील मन्याळे (ता. अकाेले) येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव (५५)  यांनी बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मंत्रालयाच्या पहिल्या माळ्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनासमाेर विष प्राशन करून अात्महत्येचा प्रयत्न केला. पाेलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अाता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. भैरवनाथ जाधव यांच्यावर यशाेमंदिर पतसंस्थेचे कर्ज हाेते. नापिकीमुळे ते कर्ज फेडण्यास असमर्थ ठरले हाेते. कर्जमाफीच्या मागणीसाठी त्यांनी काही महिन्यांपूर्वी गावातील विहिरीत बसून उपाेषणही केले हाेते. शिर्डीचे खासदार सदाशिव लाेखंडे यांनी कर्ज भरण्याचे अाश्वासन देत त्यांना उपाेषण मागे घ्यायला लावले हाेते. मात्र यानंतरही कर्जमाफी न झाल्यामुळे जाधव यांनी हे  टाेकाचे पाऊल उचलले.
बातम्या आणखी आहेत...