आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी मिळणार दिवसा बारा तास अखंड वीज, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेतीसाठी दिवसा १२ तास अखंड वीज देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सह्याद्री वाहिनीवरून या कार्यक्रमाचे रविवारी प्रसारण करण्यात अाले.  
 
सौरऊर्जा व पडीक शेतीसंदर्भात उमाकांत जोशी व स्वामी विशे यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सौरऊर्जेचे प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. यातूनच शेतकऱ्यांसाठी दिवसा १२ तास अखंड वीज उपलब्ध होणार आहे. सौरऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरणार आहे.’  यशवंत पोपळे व मधुकर पवार या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाबाबत प्रश्न उपस्थित केले हाेते. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होते, उत्पादकता वाढते, पिकांचे योग्य प्रकारे नियोजन करता येते. सरकार साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या मदतीने राज्यातील पाच धरणक्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार.

तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २६ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरुज्जीवन करून कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगाला चालना देणार अाहाेत.’  
 
बातम्या आणखी आहेत...