आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fashion Designer Heena Committed Suicide At Her Home In MHADA Colony In Malwani, Malad

मुंबईत 22 वर्षीय फॅशन डिझायनर तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिना गिलानी - Divya Marathi
हिना गिलानी
मुंबई- फॅशन डिझायनचे शिक्षण घेत असलेल्या हिना गिलानी या 22 तरूणीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हिना मूळची कोलकात्याची असून, वर्षभरापासून ती मुंबईत राहत होती. बुधवारी रात्री तिने मालाडमधील मालवणी येथील म्हाडा कॉलनीतील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील मरोळ येथील पर्ल फॅशन अॅकेडमीत ती शिक्षण घेत होती. हिनाच्या वडिलांचा कोलकात्यात गारमेंटचा मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी तिला फॅशन डिझायनर व्हायचे होते.
याबाबत मालवणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हिना गेल्या वर्षी मुंबईत राहयला आली होती. गेली वर्षभर ती एका हॉस्टेलमध्ये राहत होती. मात्र, 20 दिवसापूर्वीच एका मित्राच्या मदतीने तिने मालाडमधील मालवणी भागातील म्हाडा कॉलनीत एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला होता. बुधवारी रात्री तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आई-वडिलांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. मी स्वतहून आत्महत्या करीत आहे, यासाठी कोणालाही दोषी धरू नये, अशा आशयाचा मजकूर तिने लिहून ठेवला आहे.
हिनाचे आई-वडिल तिला बुधवारी रात्रीपासून फोन करीत होते. मात्र, ती फोन उचलत नव्हती. त्यामुळे वडिलांनी शेजा-यांना माहिती घेण्यास सांगितले. त्यावेळी दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आले. शेजा-यांनी पोलिसांना माहिती देऊन दरवाजा तोडला असता हिनाने गळफास घेतल्याचे लक्षात आले. शेजारीत चिठ्ठी होती. त्यात आपले आई-वडिलांवर खूप प्रेम असल्याचे तिने म्हटले आहे. मला माफ करा असेही तिने चिठ्ठीत नमूद केले आहे.
दरम्यान, हिना गेल्या काही महिन्यांपासून नैराश्यात होती. तिच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती पुढे आली आहे असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले.