आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना फॅशन िवश्वाची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदर्भातल्या काळ्या मातीचं दु:ख वेशीपार पोचले असून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बाॅलीवूडबरोबरच फॅशन विश्व धावल्याचे गुरुवारी िदसले. वरळीत झालेल्या एका फॅशन शाेला अनेक बाॅलीवूडकरांनी उपस्थिती लावत महागडी खरेदी केली. या खरेदीतून मिळणारे पैसे शेतकरी कुटुंबियांना मदतीच्या स्वरूपात देण्यात आले.

‘मिस इंडिया’ राहिलेले अभिनेत्री पूनम धिल्लनची ही सर्व कल्पना. तिची ‘मदत’ नावाची स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेच्या पुढाकाराने हाॅटेल ब्ल्यूसीमध्ये हा खास फॅशन शो पार पडला. पूनमच्या आवाहनाला प्रतिसाद देत जागतिक किर्तीच्या डिझायनरनी आपले कलेक्शन या शोमध्ये सादर केले. तसेच जमा झालेला सारा पैसा आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना देण्याची दानतही दाखवली. तरुण ताहिलानी, अबु जैन, सन्दीप खोसला, अंज्ु मोदी, आदर्श गिल, नीता लुल्ला, रितु बेरी, वरुण बहल, सुनीत वर्मा, प्रिया कटारिया, अर्चना कोचर, अनिता डोगरा, सोनाक्षी राज, संगीता खन्ना, पायल सिंघानिया या नामवंत फॅशन डिझायनरनी कलेक्शन सादर केले.

हार मानू नका : आशाताई
अभिनेत्री पद्ममिनी कोल्हापुरे व प्रख्यात गायिका आशा भोसले यांची प्रमुख उपस्थिती हाेती. पद्ममिनीने फॅशन शोमध्ये भाग घेतला. तर आशाताईंनी शेतकर्‍यांच्या अभागी विधवांना संकटांना झुंजण्याचं बाळकडू दिले. ‘जोडीदार डाव सोडून गेला तरी हार मानू नका. महिलांमध्ये मोठ्यातल्या मोठ्या संकटांना हरवण्याची ताकद आहे’, असा विश्वास आशाताईंनी दिला.

खरेदीच्या रकमेतून मदत
कलेक्शन, ज्वेलरी, पर्स या उंची वस्तुंुची शेकडो बाॅलीवूडकरांनी यावेळी खरेदी केली. त्यामागे भावना एकच होती,आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना बळ देण्याची.
बातम्या आणखी आहेत...