आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारांकित : ‘घातक असेल तर चिक्की परत घ्या’, विधान परिषद सभापतींचे आदेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला आणि बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या सूर्यकांता चिक्कीमध्ये आरोग्याला घातक असे घटक आढळल्यास चिक्कीचा साठा मागे घ्या, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शुक्रवारी दिले. एका तारांकित प्रश्नाच्या चर्चेदरम्यान त्यांनी हे निर्देश दिले.

मॅगी नूडल्समध्ये आरोग्याला घातक घटक आढळून आल्याने त्याच्यावर बंदी घालून साठा मागे घेण्यात आला, त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण विभागाने खरेदी केलेल्या सूर्यकांता चिक्कीचा साठाही मागे घेणार का, अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांनी मॅगीसंदर्भातील तारांकित प्रश्नांच्या चर्चेदरम्यान केली. या चिक्कीची अहमदनगर येथे तपासणी केली असता त्यातही घातक पदार्थ आढळल्याची बाबही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणली. त्यावर हे खरे आहे का ते तपासून पाहा आणि चिक्कीत खरोखरच आरोग्यासाठी काही घातक घटक आढळल्यास साठा मागे घ्या, असे निर्देशही त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना दिले
बातम्या आणखी आहेत...