आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर येथे पोटच्या दोन मुलांची हत्या करून जन्मदात्या वडिलांनी केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथे पोटच्या दोन मुलांची निर्घृण हत्या करून जन्मदात्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अशोक संतू फटांगरे असे मृत वडिलांचे नाव असून प्रफुल्ल (वय-7) आणि अस्मिता (वय-11) अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. घारगाव पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथील अशोक संतू फटांगरे याने  काल (बुधवारी) मध्यरात्री प्रफुल्ल आणि अस्मीताचा गळा आवळून हत्या केली आणि नंतर अशोक फटांगरे यांनी स्वत: गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
 
अशोक फटांगरे यांचे वडील  संतू फटांगरे हे बाहेर अंगणात झोपले होते त्यांच्या सकाळी हा प्रकार लक्षात आला  आणि त्यांना जबर धक्काच  बसला त्यानंतर ही वार्ता संपूर्ण गावात पसरली  आणि फटांगरे यांच्या वस्तीवर बघ्यांची एकच गर्दी झाली या घटनेची माहिती घारगाव  पोलिसांना दिली माहिती मिळताच पो नि दिलीप निघोट हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले त्यांनी आसपास चौकशी केली असता मयत फटांगर यांची  पत्नी माहेरी गेली असल्याचे समजले
कौटुंबिक  कारणाहून आपल्या मुलांची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती घारगाव  पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांनी सांगितले आहे, याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...