आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

11 व्या वर्षी आली मुंबईत, 25 व्या वर्षी बापलेकीची भेट; 14 वर्षांच्या वियोगानंतर बापलेकीची भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई /अयोध्या- उत्तर प्रदेशातील अयोध्येतून एक ११ वर्षांची मुलगी पूजा सुबोध वर्मा हरवली होती. तिची व घरच्यांची तब्बल १४ वर्षांनंतर भेट झाली. हा योग पुन्हा पूजानेच घडवून आणला. त्याचे असे झाले, २००३ मध्ये अयोध्या रेल्वेस्थानकात खेळता खेळता ती चुकून एका रेल्वेत बसली. या रेल्वेने तिला थेट मंुबईत आणून सोडले. त्यानंतर पोलिसांनी तिला नेरूळच्या अनाथालयात पाठवले होते. तेथेच ती एका शाळेत शिकली, मोठी झाली. २००९ मध्ये पूजा मुंबईतील नेरूळ येथे नितीन व सुनीता गायकवाड  या दांपत्याकडे घरकाम करू लागली. एकदा पूजाने नितीनकडे तिच्या अयोध्येतील घराविषयी सांगितले. पूजाला तिचे वडील सुबोध, आई मीरा व भाऊ आलोक यांची नावे लक्षात होती. नितीन यांनी पूजाच्या घरच्यांची माहिती घेण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांना फोन केला. यादरम्यान ५ नोव्हेंबर रोजी पूजा स्वत: अयोध्येत आली. त्यानंतर पूजा वडिलांच्या घरी परत आली. तिला पाहून सर्वांना आनंद झाला.

 

१४ वर्षांच्या वियोगानंतर बापलेकीची भेट   
तब्बल १४ वर्षांनंतर त्यांची मुलगी पूजा पुन्हा भेटली याचा आनंद साहजिकच सुबोध यांना झालेला होता. या सुखद धक्क्यानंतर हर्षोल्हासित झालेल्या  सुबोध वर्मांनी सांगितले, माझी मुलगी मला परत मिळाली. आता देवाकडे काही मागणे नाही. 

बातम्या आणखी आहेत...