आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Did Acid Attack On His 17 Year Old Son Due To Divorce

मुंबईत पित्याकडून मुलावर अ‍ॅसिड हल्ला, आई-वडिलांत आहे घटस्फोटाचा वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील धारावी भागात एका पित्यानेच आपल्या 17 वर्षीय मुलावर रस्त्यात अ‍ॅसिड हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विघ्नेश बागले असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या आई-वडिलांत घटस्फोटावरून वाद सुरु आहे. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विघ्नेश आपल्या आईकडे राहत होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारावीतील अबु बखार चाळीत आई हिराबाईसह विघ्नेश वास्तव्यास आहे. विघ्नेशची आई हिराबाई व पतीत पटत नसल्याने ती त्याच्यापासून वेगळे राहते. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विघ्नेश कॉलेजमधून घरी येत होता. त्याचवेळी अज्ञाताने त्याच्या शरीरावर पाठीमागून अॅसिड फेकले. त्यात त्याच्या पाठीवर गंभीर जखम झाली. विघ्नेश यात 15 टक्के भाजला असून, त्याच्यावर सायन येथील रूग्णालयात उपचार सुरु आहेत. हा हल्ला अज्ञातांनी केला असला तरी विघ्नेश आई हिराबाई व मावशी रेखा यांनी हा हल्ला विघ्नेशच्या वडिलांनीच केला असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या विघ्नेशचे वडिल फरार आहेत. धारावी पोलिसांनी मात्र अज्ञातांविरू्दध गुन्हा दाखल करीत त्याच्या वडिलाचा शोध सुरु केला आहे. त्याला पकडल्यानंतर त्याच्याविरू्दध गुन्हा नोंदविला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.
आई- वडिलांत घटस्फोटावरून वाद- विघ्नेशचे वडिल चंद्रकांत आणि आई हिराबाई यांच्यात वाद आहेत. ते वेगवेगळे राहतात. त्यातच मुलगा आईकडे राहतो. त्यामुळे मानसिक तणावातून हा हल्ला पित्यानेच केला असल्याचे सांगितले जात आहे. चंद्रकांत याने विघ्नेशच्या आईला याच वादातून धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या वादातूनच मुलगा विघ्नेशवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. चंद्रकात सध्या फरार आहे.