आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांची देखभाल करावीच लागेल - मुंबई उच्च न्यायालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘मुलांचा सांभाळ करताना वडिलांनी जरी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली नसली तरी मुलाला त्याच्या कर्तव्यात अजिबात कसूर करता येणार नाही,’ असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने देत पोलिस मुलाला वडिलांचा सांभाळ करण्याचे निर्देश दिले.


नरेश शही (नाव बदलले आहे) यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. शहा काही दिवसांपूर्वी निवृत्त झाले आहेत. मात्र, मुलाने घराबाहेर काढल्याने त्यांना पुन्हा नोकरी करावी लागत आहे. काही वर्षांपूर्वी मुलाने शहा यांचा फ्लॅट स्वत:च्या नावावर करून घेतला होता. ‘वयोमानामुळे मी आता काम करू शकत नाही. त्यामुळे मुलाने मासिक खर्चासाठी दरमहा दहा हजार रुपये द्यावेत,’ अशी मागणी याचिकेत केली आहे. मुलाने नमूद केले की, वडिलांनी माझ्यासह आई व दोन मुलांची कायमच उपेक्षा केली आहे. त्यामुळे त्यांनी आमचे पालन-पोषण योग्य प्रकारे केले नाही.


पत्नी व मुलीचा विरोध
शहा यांची पत्नी सध्या मुलीसह पोलिस दलात कार्यरत असलेल्या मुलाच्या घरी राहतात. दोघींनी शहा यांना मासिक खर्च देण्यास विरोध केला आहे. त्यांना दारू पिण्याची सवय असल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे. उभ्या आयुष्यात आपल्या कमाईचा एक पैसाही आपल्याला पतीने दिली नाही. केवळ कुटुंबाला त्रास देण्यासाठी ते असे उद्योग करत असल्याचे शहा यांच्या पत्नीचे म्हणणे आहे.


काय म्हणाले न्यायालय ?
मुलांचा सांभाळ करताना वडील जरी जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले असले तरी मुलाला आपले कर्तव्य पार पाडावेच लागेल. त्यामुळे वडीलांचा सांभाळ करण्यात कोणतीही कसून होता कामा नये, असे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले.