आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजिया खान यांनी अखेर मंत्रिपद सोडले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या सहा महिन्यांपासून विधानसभा तसेच विधान परिषद या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसूनदेखील शिक्षण राज्यमंत्रिपदी राहिलेल्या फौजिया खान वादाचा विषय ठरल्या होत्या. त्यांना मंत्रिपदावरून हटवा, अशी मागणी शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी केली होती. परिणामी फौजिया यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला.

राष्ट्रवादीच्या फौजिया खान यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी १२ मार्च २०१४ ला संपुष्टात आला होता. मात्र, नियमाचा आधार घेऊन त्या मंत्रिपदी राहिल्या. दोन्ही सभागृहांचे सदस्यत्व नसले, तरी सहा महिने मंत्रिपदावर राहता येते, या नियमाचा फायदा फौजियांनी घेतला. मात्र, सदस्य नसताना मंत्रिपदी राहणे, नैतिकेला धरून नाही, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. १२ सप्टेंबरला सहा महिन्यांचा कार्यकाल संपत असल्याने शुक्रवारी फौजिया यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून आपण मंत्रिपदाचा पदभार सोडत असल्याचे सांगितले.