मुंबई - आयआयटी खरगपूर येथील एका विद्यार्थ्याला
फेसबुकतर्फे अमेरिकेतील नोकरीसाठी 1.55 कोटी (बोनस सहित) रूपयांचे वर्षिक पॅकेजची ऑफर देण्यात आली आहे. आत्तापर्यंतच्या ऑफर्सपैकी देण्यात आलेली ही ऑफर सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे.
आयआयटी फिल्डमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी ऑफर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकने आयआयटी खरगपुर विद्यार्थ्याला कॅलिफोर्निया येथे जॉबचा प्रस्ताव दिला आहे.
कॅम्पस सुत्रांनी सांगितले की, यामध्ये
सॅमसंगने 93 लाख,
मायक्रोसॉफ्टने 80 लाख, ऑरॅकलने 87 लाख ,गूगलने 78 लाख आणि वीजा इंकने 87 लाखाची ऑफर दिली आहे. आयआयटी-बीएचयूमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीने 77.5 लाखाची ऑफर दिली आहे. मागील वर्षात देण्यात आलेल्या सर्वात मोठ्या ऑफरपेक्षा 19 टक्के अधिक आहे.
मागच्या सोमवार (दि.1) पासून आयआयटी प्लेसमेंट सीजनची धमाकेदर सुरूवात झाली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 15 ते 20 टक्के जास्त विद्यार्थ्यांना जॉब ऑफर देण्यात आली आहे. तसेच पगारामध्ये 10 ते 20 टक्के वाढ देण्यात आली आहे. या वर्षीच्या प्लेसमेंट सीजनमध्ये 30 टक्के ज्यास्त ग्लोबल ऑफर्स देण्यात आले आहेत. सोमवारी येथील वातावरण खुप उत्साहाचे असल्याचे दिसले.