आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Feeling Proud For Carrying Out 2011 Mumbai Triple Blasts Yasin Bhatkal

हिंदू-मुस्लिमांसह निरपराधांना बॉम्बस्फोटांत ठार मारल्याचा आनंदच- यासिन भटकळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- यासिन भटकळ)
मुंबई- देशभर मी जे काही बॉम्बस्फोट घडविले त्याचा मला आता अजिबात पश्‍चात्ताप होत नाही उलट मुंबईत 2011 साली तिहेरी बॉम्बस्फोट घडविल्याचा आणि त्यात हिंदू-मुस्लिमांसह निरपराधांना ठार मारल्याचा मला आनंदच वाटतो, असे राक्षसी वक्तव्य इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेचा दहशतवादी यासिन भटकळ याने केले आहे.
सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या भटकळला एनआयएने 5 फेब्रुवारी 2014 रोजी नेपाळ- बिहार सीमेवर पकडले होते. मुंबई पोलिसांना यासिन भटकळचा कबुलीजबबाब घ्यायाच होता. त्यानंतर यासिननेही कबुलीजबाब देण्याची इच्छा व्यक्त केल्याने मुंबई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला. यासिन भटकळसोबत अटक करण्यात आलेल्या असदुल्लाह अख्तर यानेही यावेळी भटकळसारखीच कबुली दिली आहे.
मुंबईतील पोलिस उपायुक्त किशोर जाधव यांच्यासमोर कबुलीजबाब नोंदविणार्‍या भटकळ याने सांगितले की, मी आजपर्यंत जे काही केले आहे त्याबद्दल मला कसलाही पश्‍चात्ताप होत नाही. कारण 2002 साली गोध्रा येथे उसळलेल्या जातीय दंगलीचा बदला घेण्यासाठीच 2005 पासून आम्ही देशातील विविध भागांत हे बॉम्बस्फोट घडविले आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट घडविल्याचा मला त्रास न होता मी जे काही करीत आलोय त्याबद्दल अभिमानच वाटत आला आहे. गोध्रा दंगलीतही निरपराध मुस्लिमांचे बळी गेले त्यामुळे देशभरातील विविध बॉम्बस्फोटात अनेक जण मारले गेल्यामुळे मी खूष आहे. तसेच आपले इसिप्त साध्य केल्याचे समाधान वाटते. मी जे काही कृत्ये केली आहेत त्याची जराही खंत नाही. त्यामुळेच मला बॉम्बस्फोट घडवून आणल्याची जाहीर कबुली देण्यास काहाही वावगे वाटत नाही. कारण बॉम्बस्फोट घडविणे मी गुन्हा मानत नाही, असे क्रूर यासिन भटकळने कबुलीजबाबब देताना सांगितले.
जुलै 2011 मध्ये यासिन भटकळ व त्याच्या सहकारी दहशतवाद्यांनी झव्हेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादरमधील कबूतरखान्याजवळ भीषण तिहेरी बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यात 21 निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागला होता.