आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेंबूरमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; संतप्त शिवसैनिकांनी तोडले बॅरिगेटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चेंबूरमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी लावलेले बॅरिगेटिंग तोडून शिवसैनिकांनी काँग्रेस कार्यकर्त्यांशी बाचाबाची केली.
 
महागाई विरोधात युवक काँग्रेसतर्फे चेंबुरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयासमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे शिवसैनिकांनी पोलिसांनी लावलेली बँरिगेटींग तोडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची केली.

या किरकोळ बाचाबाचीचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करुन गर्दी पांगवली. 

बातम्या आणखी आहेत...