आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सिद्धार्थ’च्या आजी-माजी प्राचार्यांची काॅलेजात मारामारी, आंबेडकर-आठवले वादाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातील आजी- माजी प्राचार्यांत गुरुवारी महाविद्यालयातच तुंबळ हाणामारी झाली. गेले दशकभर वादग्रस्त ठरलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उरल्यासुरल्या अब्रूची लक्तरे या घटनेने वेशीवर टांगली आहेत.

मुंबईत फोर्ट व वडाळा या भागात ‘पीपल्स’ची चार महाविद्यालये आहेत. संस्थेवरील वर्चस्वावरून बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर अाणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यात तीन वर्षांपासून संघर्ष चालू आहे. सध्या या चार महाविद्यालयांवर आंबेडकर गटाचे वर्चस्व आहे.

प्राचार्य कृष्णा पाटील यांना २०१३ मध्ये विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क वसूल केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. ते आठवले गटाचे अाहेत. त्यामुळे सिद्धार्थ महाविद्यालयाचा कारभार आता आंबेडकर गटाचे एम. यू. म्हस्के हे प्रभारी प्राचार्य पाहतात.
या पार्श्वभूमीवर कृष्णा पाटील यांनी काही गुंडांच्या मदतीने गुरुवारी फोर्टमधील सिद्धार्थ कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हस्के यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. केबिनमध्येच त्यांना गंभीर मारहाण करण्यात आली. त्यानंतर म्हस्के यांच्या समर्थकांनी पाटील गटावर हल्ला केल्याचाही प्रत्यारोप झाला. विशेष हा सारा प्रकार काॅलेज चालू विद्यार्थ्यांसमक्ष झाला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आझाद मैदान अाणि मीरा रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून कोणासही अटक केलेली नाही.

माझ्या घरी येऊन निलंबीत प्राचार्य कृष्णा पाटील यांनी माझा राजीनामा लिहून घेतल्याचा आरोप प्रभारी प्राचार्य म्हस्के यांनी केला आहे. तर मी प्राचार्य असताना म्हस्के हे जबरदस्तीने कारभार पाहात आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे.

वादामुळे संस्थेची वाताहात
पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. आंबेडकर अाणि आठवले गट संस्थेचे खरे विश्वस्त आपणच असल्याचा दावा करत आहेत. दोघांंच्या वादात मात्र बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या नामवंत अशा शिक्षण संस्थेची मात्र वाताहात झाली आहे.