आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण येथे बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाला. - Divya Marathi
कल्याण येथे बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाला.
मुंबई- कल्याण येथे बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाल्याची घटना रविवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
 
कल्याण पूर्वेत शीतल मंढारी आणि माधुरी काळे या प्रभाग 98 आणि 99 च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यात काळे यांनी मंढारी यांच्या प्रभागात मागच्या टर्ममध्ये झालेल्या कामाचा बॅनर एका सोसायटीत लावल्याने या दोघींमध्ये वाद झाला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

हा वाद पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी रात्री उशिरा माधुरी काळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा, तर मंढारी आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...