आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्ध देशासाठी करावे, निवडणुकांसाठी नको - ठाकरेंचा पवारांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर बदला घेण्याची घोषणा केली जाते, तेवढ्यापुरते अश्रू गाळले जातात, परंतु नंतर हल्ले विसरले जातात. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे चर्चेचे गुऱ्हाळ लावतात, परंतु आता पाकिस्तानशी संबंध तोडून जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. मात्र हे युद्ध देशासाठी केले जावे, निवडणुकांसाठी नाही,’ या शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

पालघर येथील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना भवन येथे पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पठाणकोट झाले, आता उरीला हल्ला झाला. त्यापूर्वी मुंबईवर हल्ला झाला होता. हल्ला झाल्यानंतर काही वेळ जोरात चर्चा होते, परंतु नंतर होत काही नाही. क्षणिक संतापाला अर्थ नाही. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळण्याची वेळ आता आली आहे. अधिवेशनापूर्वी विरोधक सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार घालतात, परंतु येथे हल्ले झाल्यानंतरही ‘चहापान’ सुरूच आहे. पाकिस्तान आपल्याशी कसे वागते याचा विचार केला पाहिजे. राजनाथ सिंह यांचा अधिकृत दौरा पाकिस्तानमध्ये सुरू असतानाही पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांनी त्यांचा कार्यक्रम दाखवला नाही. जेवण होते तेव्हा तेथे भारतीयांना येऊ दिले नाही. आपण मात्र त्यांच्या माजी मंत्र्यांचे स्वागत करतो. पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत. त्यांनी हल्ला करायचा आणि आपण चर्चा करायची, असे एकतर्फी नको. असे किती वर्षे चालणार? पाकिस्तानची भाषा आपल्याला कधी समजणार आणि त्यांना त्यांच्याच भाषेत कधी उत्तर देणार? थंड डोक्याने काम करण्यात अर्थ नाही. उरी येथे झालेल्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळाली होती मग नक्की कुठे काय घडले? असे प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
मराठा आरक्षणाबाबत उद्धव म्हणाले, ‘याबाबत शिवसेनेची भूमिका योग्य वेळी मांडली जाईल. मात्र या विषयावर एक दिवसीय विशेष अधिवेशन घेतले जावे यात सर्व पक्षांनी आपली मते मांडावीत. शरद पवार यांनीही लोकसभेत मराठा आरक्षण आणि अॅट्रॉसिटीबाबत चर्चा करावी.’
पुढे वाचा..
> देशात बदल झाला असे कसे म्हणायचे?
बातम्या आणखी आहेत...