आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण नियम न पाळणा-या संस्थांवर खटले दाखल करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पर्यावरण विभागाचा प्रशासनावर वचक नसल्याची टीका करून पर्यावरणाचे नियम न पाळणा-या महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायतींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित संस्थांवर खटलेही दाखल करावेत, अशी शिफारस लोकलेखा समितीने (2012-13) आपल्या 13 व्या अहवालात केली आहे. राज्यातील जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणारी व्यवस्थापनांबद्दल तसेच प्रदूषण व आरोग्याच्या मुद्द्यांवर लोकलेखा समितीने आपली निरीक्षणे नोंदवली असून जैव कच-याची विल्हेवाट लावण्यामध्ये होणा-या दिरंगाईवर बोट ठेवले आहे.
पर्यावरण विभागाच्या अहवालांची दखल स्थानिक स्वराज्य संस्थांकडून घेतली जात नसल्याने त्यांना निधी देण्याची कार्यवाही नगरविकास विभागाने करू नये. राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजना राबवण्यासाठी जो निधी दिला जातो त्याचे वाटप विभागाने थांबवावे. स्थानिक स्वराज्य संस्था जोपर्यंत त्यांच्या बजेटचा ठरावीक निधी पर्यावरणविषयक बाबींवर खर्च करत नाहीत तोपर्यंत त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, अशी शिफारसही समितीने केली आहे.


उस्मानाबादेत विल्हेवाट केंद्र
उस्मानाबाद, हिंगोली, बुलडाणा, वसई-विरार-मीरा-भार्इंदर आणि यवतमाळ या पाच ठिकाणी जैव वैद्यकीय विल्हेवाट केंद्र स्थापन करण्यासाठी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्यात आली असून त्याची संपूर्ण माहिती समितीने मागितली आहे. तसेच हे प्रकल्प लवकर पूर्ण करावेत म्हणून सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत.