आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • File Charge Sheet In Fodder Scam, High Court Order

चारा घोटाळ्यात गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद - महाराष्‍ट्रातील कोट्यवधींच्या चारा घोटाळ्यात महिनाभरात गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. पोलिस तपासात काही सत्ताधारी नेत्यांची नावे असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.


विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी विधिमंडळ अधिवेशनात पशुखाद्य पुरवठ्यात घोटाळा झाला असल्याचा आरोप करून सीआयडी चौकशीची मागणी केली होती. मात्र, या तपासात होत असलेला विलंब पाहून सामाजिक कार्यकर्ते अनिल शर्मा यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी
केली होती.

शुक्रवारी यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती के. यू. चांदिवाल आणि न्या. एआयएस चिमा यांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. यापूर्वी नाशिक पोलिसांनी यासंबंधीचा तपास अहवाल न्यायालयात दाखल केला होता. तपास अहवालात काही सत्ताधारी नेत्यांची नावे आहेत. या सर्वांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 409 आणि 420 अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस पोलिसांनी केली होती.