आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जान्हवी गडकरविरोधात ५६० पानांचे आरोपपत्र दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली महिला वकील जान्हवी गडकर हिच्याविरोधात मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात सोमवारी आरोपपत्र दाखल केले.
जान्हवीविरोधात ५६० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ५७ जणांच्या साक्षी घेण्यात आल्या, तर १४ जणांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. सुनावणीदरम्यान जान्हवी न्यायालयात हजर होती. १० जून रोजी जान्हवीने बेदरकारपणे ऑडी कार चालवून दोघांना उडवले होते. यात अब्दुल सय्यद (५५) आणि मोहंमद साबुवाला (५०) यांचा मृत्यू झाला होता.