आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर दीड वर्षांनी समोर आले पतीचे सत्य, महिलेची फिर्याद ऐकल्यानंतर पोलिसही झाले थक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले असून तिला एक मुलगी आहे. - Divya Marathi
महिलेचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले असून तिला एक मुलगी आहे.
मुंबई- कल्याण येथील बिर्ला कॉलेज भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या नवऱ्याविरोधात पोलिसांकडे मारहाण आणि फसवणूक केल्याची फिर्याद दिली. महिलेची फिर्याद ऐकल्यानंतर पोलिसही थक्क झाले. या महिलेचा नवरा गे होता आणि त्याने पुर्वीच एका पुरुषासोबत लग्न केले होते. याची माहिती या महिलेला समजल्यावर त्याने तिचा छळ सुरु केला होता.
 
असे समोर आले सत्य
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयासमोर राहणाऱ्या एका युवकाचे डिसेंबर 2016 मध्ये लग्न एका 28 वर्षाच्या युवतीसोबत झाले. 
- ती सावळी असल्याने सासरेचे तिला त्रास देत होते. लग्नानंतर तिला एक मुलगीही झाली आहे. सासरच्या प्रमाणेच तिचा नवराही तिच्यासोबत चांगले वर्तन करत नव्हता.
- एक दिवस या महिलेला आपला नवरा गे असल्याचे समजले. त्याने 2015 मध्येच एका युवकाबरोबर लग्न केल्याचेही तिला समजले.
- तिने याबाबत नवऱ्याला विचारल्यावर त्याने तिला धमकावले आणि मारहाण केली.
- त्यांच्या या छळाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी तिचा नवरा, सासु-सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.  
बातम्या आणखी आहेत...