आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fill 14 Thousand Teachers Vacant Post Within A Year, High Court Order To State

शिक्षकांची 14 हजारांवर रिक्त पदे वर्षभरात भरा,उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील 14 हजार 844 शिक्षकांची रिक्त पदे एप्रिल 2015 पूर्वी भरावीत, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले. मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. शिक्षक मतदार संघातील आमदार रामनाथ मोते यांनी ही याचिका दाखल केली आहे.
राज्यातील अनेक डीटीएड आणि बीएड महाविद्यालयांतून गरजेपेक्षा अधिक पदविका प्राप्त उमेदवार बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने 2012 मध्ये शिक्षकांची भरती बंद केली आहे. डीटीएड पदविका प्राप्त उमेदवारांना नोकरी मिळत नसल्याने नैराश्य आले आहे. त्यामुळे शाळांत शिक्षक अतिरिक्त होत असल्याचे सांगून भरती बंद करणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण शहा यांनी नोंदवले. ती एप्रिल 2015 पर्यंत ही पदे भरावीत, असे निर्देश न्यायालयाने दिले.
प्राध्यापकांसाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षण !
कॉलेजातील विषयनिहाय आरक्षणाच्या धोरणामुळे सामाजिक आरक्षणातील सर्व मागास प्रवर्गांना त्याचा लाभ होत नव्हता. त्यामुळे प्राध्यापक पदासाठी यापुढे संवर्गनिहाय आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे.