आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7/11च्या बॉम्बस्फोट मालिकेवर फिल्म, पराग सावंतची कथा येणार सिल्व्हर स्क्रीनवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पराग सावंतचा मृत्यू पुर्वीचा फोटो, आणि 'बाबा रिटायर्ड झाले' चित्रपटाचे पोस्टर
११ जुलै २००६ हा दिवस मुंबईसाठी एक काळा दिवस होता, त्यादिवशी मुंबईची जीवनवाहिनी असणा-या पश्चिम रेल्वेमार्गावर मध्ये ११ मिनीटांमध्ये, सात वेगवेगळ्या ट्रेन्समध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. आणि त्यात मृतांचा आकडा २०९वर पोहोचला होता. तर जखमी झालेल्यांची संख्या ७०० पेक्षा अधिक होती. आणि त्यातच होता, पराग सावंतही.
पराग सावंत गेली ९ वर्ष मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. पण दुर्देवाने त्याचा ७ जुलैला मृत्यू झाला. त्याची ही हृदयद्रावक जीवनकहाणीच आता सिल्व्हर स्क्रिनवर येत आहे. परागवर बनणा-या ह्या चित्रपटाचे नांव आहे, ‘बाबा रिटार्यड झाले.’
‘बाबा रिटायर्ड झाले’ह्या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करणार आहेत पत्रकार निशांत भुसे. निशांत भुसे गेली १७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रात आहेत. शोध पत्रकारितेत त्यांचा व्यासंग आहे. आणि एक पत्रकार बॉम्बस्फोट मालिकेविषयावरची फिल्म करतो तेव्हा उत्सुकता चाळवतेच. या चित्रपटाविषयी निशांतशी बोलल्यावर त्यांनी सांगितले की, “मुंबईत त्यादिवशी झालेल्या सात बॉम्बस्फोटांपैकी एक बॉम्बस्फोट हा माहिमला झाला होता. जेव्हा हा बॉम्बस्फोट झाला, तेव्हा मी माहिम स्टेशनपासून १० मिनीटांच्या अंतरावरच होतो. बॉम्बस्फोट झाल्याचे कळल्यावर तातडीने बातमी कव्हर करायच्या उद्देशाने माहिमला पोहोचलो खरा. पण घटनास्थळी पोहोचताच, मन हेलावून गेलं. पत्रकार हाही एक संवेदनशील माणूसच असतो की. समोर पाहिलेलं दृश्य मनाच्या कोप-यात तसंच राहिलं. आजही त्या विचारांनी मन बेचैन होते. नेहमी अशावेळेस आम्ही पत्रकार एक बातमी किंवा लेख लिहीतो. पण ह्यावेळेस लेखणी हातात घेतली, ह्या सर्व घटनांवर चित्रपटाची कथा लिहीण्यासाठी.”
पराग सावंत विषयी विचारल्यावर त्यांनी सांगितले की, “फक्त परागच नाही. त्यादिवशी अमित सिंगलाही जबर दुखापत झाली होती. त्याचाही यात दुर्देवी अंत झाला. असे अनेकजण आपल्या जवळच्या माणसांना सोडून गेले. आणि त्यांच्या कुटूंबाला होणारे त्रास आपण फक्त इमॅजिनच करू शकतो. गेली तीन वर्ष मी ह्या चित्रपटावर रिसर्च करून लिहीतोय. स्क्रिप्ट पूर्ण झालीय. बॉम्बस्फोटातल्या वेगवेगळ्या घटनांचा कोलाज असेल, बाबा रिटायर्ड झाले.”
चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार आहेत, लगान, दिल चाहता है, सरकारराज सारख्या चित्रपटांवर काम केलेल हरदीप सचदेव, तर जॉन डे, WTF आणि कामसुत्रा-3Dची निर्मिती करणारे सागर ठक्कर यांची ही पहिली मराठी फिल्म आहे. चित्रपटाचे लवकरच ऑगस्टमध्ये चित्रीकरण सुरू होतंय. कान्स, व्हेनिस, टोरान्टो आणि बर्लिनमध्ये होणा-या चित्रपट महोत्सवात ही फिल्म घेऊन जाण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
पूढील स्लाइडमध्ये पाहा, नक्की काय झालं होतं त्यादिवशी ....