आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदवर येतोय आणखी एक चित्रपट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर अंडरवर्ल्डवर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. यामध्ये मग अमिताभ यांचा दीवार असो की रामगोपाल वर्मा यांचा कंपनी हा चित्रपट. यानंतर आता गुन्हेगारी विश्वावर भाष्य करणारा आणखी एक चित्रपट निखिल अडवाणी घेऊन येतोय. मात्र, या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
तसेच या चित्रपटामध्ये अर्जुन रामपाल आणि रोनित रॉय यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. दरम्यान, निखिलला या चित्रपटाचे चित्रीकरण अफगाणिस्तान येथे करायचे आहे. त्यादृष्टीने तो प्रयत्नदेखील करत आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना त्याने सांगितले की, या चित्रपटाची पटकथा लिहून पूर्ण झाली आहे. तसेच यामध्ये आणखी कोणत्या कलाकारांना घ्यायचे हे अद्याप ठरले नाही. त्यामुळे या चित्रपटाबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नसल्याचे त्याने सांगितले.
बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून अंडवर्ल्डवर चित्रपट करण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. तसेच अंडवर्ल्डवर भाष्य करणारा चित्रपट आला की तो हमाखास हिट होतो. तसेच अशा चित्रपटांना प्रेक्षकही चांगला मिळतो. त्यामुळे अनेक दिग्दर्शक गुन्हेगारी विश्वावर चित्रपट करण्याचे धाडस दाखवत आहेत. त्यामुळे निखिल अडवाणीचा हा चित्रपट काय कमाल दाखवतो हे तर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

बॉलीवूडला अंडरवर्ल्डचे आकर्षण
साधारण दहा वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर रामगोपाल वर्मा यांच्या सत्या या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. या चित्रपटात मनोज वाजपेयी यांची भिकू म्हात्रे याची भूमिका विशेष गाजली होती. तसेच अंडरवर्ल्डमध्ये होणारे गँगवॉर आणि पोलिसांची जुगलबंदी याबाबत या चित्रपटात अतिशय बारकावे दाखवण्यात आले होते. त्यानंतर कंपनी, अब तक छप्पन, शूट आऊट आॅफ लोखंडवाला, वन्स अपॉन टाइम इन मुंबई या चित्रपटांनी दाऊदशी साम्य असणाºया भूमिका दाखवून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.