आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दमानियांबाबत अपशब्द वापरल्‍याचा आरोप; अखेर एकनाथ खडसेंविरूद्ध गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अापल्याबाबत अश्लील वक्तव्य केल्याचा अाराेप करून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंविरुद्ध वाकाेला पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती, मात्र ती घेण्यास टाळाटाळ केली जात हाेती.  तब्बल २८ तास या पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अखेर गुरुवारी तक्रार दाखल करून घेत खडसेंवर गुन्हा दाखल केल्याचा दावा दमानिया यांनी केला अाहे. 

जळगाव येथे २ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात खडसेंनी आपल्या नावाचा उल्लेख करत अतिशय असभ्य व आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दमानिया यांचा आरोप होता. ही तक्रार देण्यासाठी बुधवारी वाकोला ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही दमानिया यांनी केला होता.
बातम्या आणखी आहेत...