आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद अखेर काँग्रेस पक्षाकडे; रवी राजांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पालिकेत गेल्या एक महिन्यापासून रेंगाळत असलेला पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा गुंता मंगळवारी अखेर सुटला. भाजपने विरोधी पक्षाचे स्थान स्वीकारण्यास नकार दिल्याने जागा कमी असतानाही काँग्रेसला विरोधी पक्षाचे स्थान देण्यात आले. मुंबई पालिकेच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याची नोंद पहिल्यांदाच पालिकेच्या रेकॉर्डवर आली. दरम्यान, काँग्रेसच्या रवी राजा यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.   

मुंबईच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपदाची खुर्ची महिनाभर रिक्त होती. पालिकेत संख्याबळानुसार दोन क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने कोणत्याही समितीची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद कुणाला द्यायचे, असा पेच निर्माण झाला होता.    

कायद्यानुसार दोन नंबरचा पक्ष असलेल्या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपद देता येते. दोन क्रमांकाच्या  पक्षाने विरोधी पक्षाचे स्थान न स्वीकारल्यास त्यानंतरच्या संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळायला हवे, असा हरकतीचा मुद्दा मांडून त्यावर काँग्रेसने दावा केला होता.    
बातम्या आणखी आहेत...