आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Ramdass Athawale File Form For Rajyasabha From The Quota Of Bjp

भाजपच्या कोट्यातून रामदास आठवलेंना उमेदवारी जाहीर, उद्या अर्ज भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यसभेसाठी भाजपच्या कोट्यातील एकमेव जागेतून आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने आठवलेंना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. रामदास आठवले उद्या मुंबईत अर्ज दाखल करतील. अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे.
दरम्यान, भाजपने प्रकाश जावडेकरांचे नाव मागे ठेवून आठवलेंना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवत आहे. मात्र जावडेकरांचे पुढे काय व त्यांचे कोठे पुनर्वसन करण्यात येणार याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. गुजरातमधून किंवा छत्तीसगडमधून त्यांना राज्यसभेवर पाठविले जाऊ शकते. गुजरातमध्ये चार तर छत्तीसगडमधून 1 सदस्य राज्यसभेवर पाठविला जाणार आहे.