आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन अखेर मैदानात उतरलाच, चाहत्यांची इच्छा देवाने पूर्ण केली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मागील काही दिवसापासून सचिनच्या शेवटच्या कसोटीचा क्षण जसाजसा जवळ येत होता तशीतशी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर आजचा तो ऐतिहासिक दिवस उगवला. आज सचिनची फलंदाजी पहायची म्हणून चाहत्यांची सकाळपासूनच लगभग सुरु झाली होती. मुंबईसारख्या खचाखच भरलेल्या महानगरातून अखेर चाहते वानखेडे दाखल झाले होते. रांगा लावून आता प्रवेश दिला जात होता. स्टेडियमवर स्थानापन झाल्यानंतर थोड्याच वेळात टॉस होणार होता. भारताने टॉस जिंकावा म्हणून हजारो जण प्रार्थना करीत होते. त्याप्रमाणे भारताने टॉस जिंकला पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीने प्रथम गोलंदाजी करीत वेस्ट इंडिजला फलंदाजीला पाचारण केले अन् स्टेडियममध्ये एकच निराशेचा सूर उमटला.
थोड्या वेळाने सचिन तेंडूलकरसह भारतीय संघाने थाटातच मैदानात प्रवेश केला. मात्र, आज दिवसभर वेस्ट इंडिज संघाची फलंदाजी पाहायला मिळणार असे गृहित चाहत्यांनी धरले होते. मात्र, शमीने ख्रिस गेलला बाद लवकर बाद केले आणि त्यानंतर एक-एक फलंदाज बाद होऊ लागल्याने चाहत्यांना भारतीय संघाची फलंदाजी पाहायची आशा निर्माण झाली. मात्र, बघता-बघता दुपारी दोन वाजताच 55 षटकात इंडिज संघ 182 धावांत गारद झाला. त्यानंतर भारतीय सलामीवीर शिखर धवन व मुरली विजय फलंदाजीला आले. या दोघांनी भन्नाट सुरुवात करून दिली. मात्र, चाहत्यांना ते नको होते. हे सलामीवीर कधी एकदाचे बाद होताहेत आणि सचिन फलंदाजीला येतो, अशी त्यांची अवस्था झाली होती.
मात्र, क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची चाहत्यांची इच्छाही ख-याखु-या देवाने पूर्ण केली. दुपारी साडेतीनच्या सुमारास धवन आणि विजय या सलामीवीरांनी 13 षटकातच 77 धावांची सलामी दिली. हे दोघे चौफेर फटकेबाजी करीत मनमुराद फलंदाजीचा आनंद लुटत होते. त्याचवेळी 14 वे षटक घेऊन शिलींगफोर्ड मैदानात आला. त्याने षटकाच्या दुस-या चेंडूवर धवनला (33) तर चौथ्या चेंडूवर मुरली विजयला (43) झेलबाद केले. त्यामुळे एकाच षटकात चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडूलकर मैदानात उतरले. त्यावेळी प्रेक्षकांनी मैदानात एकच आवाज केला. 'सचिचिचिचनननननन सचिन' या आवाजाने मैदान निनादले.