आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Shivsena Congrats Aap & Arvind Kejriwall With Heavy Advise

लोकांना फुकटे करु नका, हादेखील भ्रष्‍टाचार- शिवसेनेचा केजरीवाल आणि कंपनीला सल्‍ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘आप’चे सरकार दिल्लीच्या जनतेने निवडून दिले. सत्तेवर आलेल्या ‘आप’वाल्यांना आम्ही आज तरी शुभेच्छा देत आहोत असे सांगत शिवसेनेने केजरीवाल आणि त्यांच्या टीमला अखेर शुभेच्छा दिल्या आहेत. अण्णांच्या आंदोलनाला व जनलोकपाल विधेयकाला कायमच विरोध करीत आलेल्या सेनेने अखेर जनतेची मर्जी म्हणत आपला शुभेच्छा दिल्या आहेत.
याच शुभेच्छांबरोबर केजरीवाल यांना फुकटचा सल्ला दिला असून, ऊठसूट इतरांना दलाल व भ्रष्टाचारी ठरवून स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध होत नाही. राज्यकर्त्याने राज्यकर्त्यासारखे वागावे, राज्य करावे. आज केजरीवाल ज्या पद्धतीने चालत, बोलत आहेत, जो वेश, आवेश दाखवीत आहेत याच गोष्टी कधीकाळी लालू यादवांनीही केल्या होत्या. त्यांनीदेखील पुंगी वाजवून गारूड निर्माण केले होते. तेच गरीबांचे मसिहा लालू यादव भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात गेले व सत्ता असताना बिहारात काहीच करू शकले नाहीत, असे सांगत वास्तवदर्शी राजकारण करा असा सल्ला दिला आहे. लोकांना मोफत आणि फुकटात काहीच नको असते. त्यांना फुकटे करू नका, तसे करणे हासुद्धा एक भ्रष्टाचार आहे याची जाणीव करून दिली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखाद्वारे शिवसेनेने प्रथमच दिल्लीकर जनतेने निवडून दिल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. याचबरोबर त्यांना राजकीय सल्ले दिले आहेत. ऊठसूट सर्वांनाच दलाल, भ्रष्टाचारी म्हणून हेटाळणे योग्य नाही. आता तुम्ही राज्यकर्ते झाला आहात तेव्हा त्यांच्यासारखे वागा आणि राज्य करा, असे सांगितले आहे.
पुढे वाचा, सेनेने शुभेच्छा देत काय-काय चिमटे काढले व उदाहरणे दिलीत....