आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally Vijaya Bangade Appoint As State Woman Commission Chairman ?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर विजया बांगडे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. विजया बांगडे यांची नियुक्ती जवळपास निश्चित झाली आहे. याबाबत केवळ औपचारिक घोषणा बाकी असल्याची माहिती महिला बालविकास विभागातील सूत्रांनी दिली.

अध्यक्षपदाच्या संभाव्य नावांची फाईल मंत्रालयातील आगीत जळाल्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने पुन्हा फाइल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. मात्र, त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी लवकरच अध्यक्ष दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर अजूनही कारवाई न झाल्याने पक्षातही नाराजी होती.

महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर चंद्रपूर येथील अ‍ॅड. विजया बांगडे यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याचे समजते. त्या महिला आयोगाच्या माजी सदस्या आहेत. महिला प्रदेशाध्यक्षा कमलताई व्यवहारे, जेनेट डिसुझा आणि अ‍ॅड. सुशीबेन शाह याही शर्यतीत होत्या. मात्र, डिसुझा यांना अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदाचे आश्वासन देऊन बांगडे यांचा मार्ग मोकळा करण्यात आला.