आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finance Department Officers Reject To Ministry Office

मंत्रालयात काम करण्यास अर्थ विभागाच्या अधिका-यांचा नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कामाला जुंपलेल्या मंत्रालयातील अर्थ विभागाच्या अधिका-यांनी सोमवारी काम करण्यास नकार दिला. मंत्रालयातील दुरुस्तीचे सुरू असलेले काम आणि वाळवीसाठी वापरण्यात आलेल्या उग्र रसायनामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

जळालेल्या मंत्रालयाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या चौथ्या मजल्यावरील कामाने वेग घेतला आहे. नेहमीप्रमाणे मंत्रालयातील वित्त विभागातील अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी कामावर आले असता दुरुस्ती कामाच्या आवाजाने त्यांना आपल्या जागेवर बसणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रधान सचिव क्षत्रपती शिवाजी यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या केबिनबाहेर आले. त्यातच लाकडांना वाळवी लागू नये यासाठी लावण्यात येणा-या रसायनाच्या उग्र वासाने त्रस्त झालेल्या या अधिका-यांनी चक्क काम करण्यास नकार दिला.

दुरुस्तीचे काम सायंकाळनंतर
अर्थसंकल्पाचे काम शांततेच्या वातावरणात आणि रात्री उशिरापर्यंत करावे लागते. मात्र सध्याच्या वातावरणात ते शक्य नसल्याचे अधिका-यांनी सचिवांच्या निदर्शनास आणून दिले. त्यातच सरकारने कर्मचा-यांना एक तास आधी येऊन एक तास लवकर जाण्याचीही सूचना केली आहे. मात्र, कामाचा ताण पाहता ते शक्य होत नाही. अखेरीस अधिकारी आणि कर्मचा-यांच्या या पवित्र्याने मंत्रालय दुरुस्तीचे काम काही काळ थांबवण्यात आले होते. आता हे काम सायंकाळनंतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.