आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट सादर करण्यापूर्वी अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार सिद्धिविनायकाच्या चरणी लीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. (फाईल फोटो) - Divya Marathi
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायकचे दर्शन घेतले. (फाईल फोटो)
मुंबई- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आज आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करीत आहेत. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आज सकाळी आकराच्या सुमारास मुनगंटीवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होऊ दे असे म्हणत साकडे घातले. गेल्यावर्षीही आपला पहिला अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक गणपतीचे सहकुटुंब दर्शन घेतले होते. यंदाही सुधीरभाऊंनी सिद्धीविनायक गणपतीचे आशीर्वाद घेतले.
दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. शेती व शेतक-यांचे मोठे हाल होत आहेत. अशा प्रसंगी त्यांच्यासाठी चांगले काम माझ्या हातून व्हावे यासाठी सिद्धीविनायकाला साकडे घातले. आजचे बजेट हे शेतीपूरक व ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवूनच सादर केले जाईल. राज्याची आर्थिक प्रगती वेगाने होऊ व महाराष्ट्राची घौडदौड कायम रहावी यासाठी गणपतीबाप्पाकडे आशीर्वाद मागितले.
पुढे या सबंधित घडामोडीची माहिती व छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...