आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Financially Stable Wife Can\'t Claim Maintenance: Bombay High Court News In Amrathi

स्वावलंबी पत्नीला पोटगीचा हक्क नाही : मुंबई हायकोर्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेली महिला विभक्त पतीकडे पोटगीचा दावा करू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. याच आधारे न्यायालयाने एका 61 वर्षीय महिलेस पोटगी मंजूर करण्यास नकार दिला.

ऑक्टोबर 2012 मध्ये एका कौटुंबिक न्यायालयाने या महिलेस पोटगी नाकारली होती. या निकालास महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आपल्या 65 वर्षीय पतीने मासिक 15 हजार रुपये पोटगीदाखल द्यावेत, अशी या महिलेची मागणी होती. पतीने या पोटगीस विरोध केला होता. आपल्या फ्लॅटस्पैकी एक फ्लॅट पत्नीच्या नावे केला असल्याचे स्पष्ट करून तिच्याच नावे केलेल्या 50 लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटवरही तिलाच अधिकार दिल्याचे पतीने म्हटले होते. शिवाय, पत्नीवर कुणीही अवलंबून नसल्याने न्यायालयाने पोटगी नाकारली.