आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Againest Former Mp Nilesh Rane For Beaten His Party Worker

काँग्रेस तालुकाध्यक्षाला नीलेश राणेंची मारहाण; पाेलिसात अपहरणाचा गुन्हा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निलेश राणे (फाईल फोटो) - Divya Marathi
निलेश राणे (फाईल फोटो)
ठाणे- मराठा अारक्षणासाठी काढलेल्या रॅलीत अनुपस्थित राहिलेल्या चिपळूणच्या काँग्रेस तालुकाध्यक्षास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे व त्याच्या साथीदारांनी अपहरण करून बेदम मारहाण केली. याबाबतची तक्रार ठाणे पाेलिसात दाखल करण्यात अाली अाहे. दरम्यान, नीलेश राणेंनी मात्र हे अाराेप फेटाळले अाहेत.

चिपळूण येथील काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी याबाबत ठाणे पाेलिसात फिर्याद दिली अाहे. २४ एप्रिल राेजी माजी खासदार नीलेश राणे यांनी मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी चिपळूणमध्ये रॅलीचे अायाेजन केले हाेते. त्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची तंबी देण्यात अाली हाेती. मात्र अाई अाजारी असल्याच्या कारणामुळे संदीप सावंत उपस्थित राहू शकले नाहीत. हा राग मनात धरून रविवारी रात्रीच नीलेश व त्याच्या साथीदारांनी संदीपच्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. तसेच अापल्या कारमधील सामान अाधी खाली काढण्यास व पुन्हा कारमध्ये ठेवण्याची ‘शिक्षा’ही दिली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संदीपला गाडीत घालून मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या सिंधुदुर्ग भवनमध्ये अाणले. साेमवारी सकाळी नीलेश अापल्या जुहू येथील निवासस्थानी निघून गेल्यानंतर त्यांचे अंगरक्षक व इतर साथीदारांनी संदीपला बेदम मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने अालेल्या नीलेश यांनीही हाॅकी स्टीकने मारहाण केल्याचे संदीप यांनी तक्रारीत नमूद केले अाहे. संदीपवर सध्या ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू अाहेत.

दरम्यान, या प्रकरणी संदीप यांच्या फिर्यादीवरून ठाणे पाेलिसांनी नीलेश व त्याच्या साथीदारांविराेधात मारहाण करणे, अपहरण करणे अादी कलमान्वये गुन्हा दाखल केला अाहे. हे प्रकरण अाता चिपळूण पाेलिसांकडे वर्ग करण्यात अाले असून अद्याप काेणालाही अटक करण्यात अाली नसल्याची माहिती ठाणे पाेलिसांचे जनसंपर्क अधिकारी गजानन कडबुले यांनी दिली.

ही तर राजकीय खेळी
दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी अापल्यावरील सर्व अाराेप फेटाळून लावले अाहेत. ‘राजकीय हेतूने प्रेरित माझ्यावर असे अाराेप केले जात अाहेत. संदीप सावंत यांनी माझ्याकडे १० लाख रुपये मागितले हाेते. मात्र अापण ही रक्कम त्यांना दिली नाही. याच कारणावरून नाराज झाल्यामुळे त्यांच्याकडून माझ्यावर अाराेप हाेत असावेत,’ असे राणे म्हणाले.

पुढे वाचा, संदीप सावंत मृत्यूच्या दारात...
संदीपची पत्नी शिवानी म्हणाली, नीलम राणेंमुळे माझ्या पतीचे वाचले प्राण...