आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेबसाईटवर अश्लील फोटो- व्हिडिओ टाकल्याने सनी लिओनविरोधात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पॉर्न स्टार व आता बॉलिवूडमध्ये स्थान बळकट करीत असलेली सनी लिओनीविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सनी लिओनने आपल्या वेबसाईटवर तसेच सोशल नेटवर्किंग साईट्सवर अश्लिल व्हिडिओ व फोटो अपलोड करून समाजात अश्लीलता पसरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे एका महिलेच्या तक्रारीनंतरच पोलिसांनी हा गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे सनीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा (IT ACT) अंतर्गत कलम 67 आणि कलम 67 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सनी लिओनला अटक होण्याची शक्यता आहे तसेच या आरोपांत ती दोषी आढळली तर तिला पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यापूर्वीही सनी लिओनविरोधात सुरतमध्ये गुन्हा दाखल झाला होता. 'एक पहेली लीला' या चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळी सूरतमध्ये लोकांची गर्दी गोळा करण्यासाठी सनी लिओनचे टॉपलेस फोटो वाटण्यात आले होते. त्याविरोधात एका नागरिकाने तिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.
बातम्या आणखी आहेत...