आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fir Againest Shivsena Leader Vijay Chaugule On Rape Case

नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नवी मुंबईचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर एका 24 वर्षीय तरूणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री हा गुन्हा दाखल झाला आहे. चौगुले यांच्यावर एका 24 वर्षीय तरूणीचे मागील 5 वर्षापासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत संबंधित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विजय चौगुले यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
संबंधित तरूणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, विजय चौगुले यांनी मागील 5 वर्षापासून आपले लैंगिक शोषण केले आहे. पाच वर्षापूर्वी एका कामानिमित्त आपण त्यांना भेटलो होतो. त्यानंतर त्यांनी मला माझे काम करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे माझा त्यांच्याशी संपर्क आला होता. मात्र, नंतरच्या काळात त्यांनी मला बोलावून माझे लैंगिक शोषण सुरु केले. तसेच याबाबत कोठे जाहीर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे आपण हा अन्याय आजपर्यंत सहन केला, असेही या तरूणीने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी चौगुले यांच्यावर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विजय चौगुले यांनी या प्रकरणाबाबत बोलण्यास नकार दिला आहे. माझा वकील याबाबत योग्य ते म्हणणे मांडेल असे चौगुले यांनी सांगितले.
विजय चौगुले हे शिवसेनेचे नवी मुंबईतील जिल्हाप्रमुख आहेत. चौगुले हे सेनेतील मोठे नेते असले तरी त्यांची पार्श्वभूमी वादग्रस्त व गुन्हेगारीविषयक राहिली आहे. त्यामुळेच यंदाच्या लोकसभेला उद्धव ठाकरे यांनी चौगुले यांचे तिकीट कापत राजन विचारे यांना संधी दिली होती. त्यात विचारे यांनी विजय मिळविला आहे. 2009 साली चौगुले यांना सेनेने तिकीट दिले होते त्यामुळे सेनेचा तेथे पराभव झाल्याचे सांगण्यात येत होते. सेनेला चौगुले यांच्या गुंडगिरीचा फटका बसला होता. चौगुले यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. हत्या करणे यासारखेही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.