आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचा बॉडिगार्ड मला बलात्काराच्या धमक्या देतो, महिलेकडून शेरा विरोधात FIR दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खानचा बॉडीगार्ड शेरावर एका महिलेने बलात्काराच्या धमक्या दिल्याचे आरोप लावले आहेत. पीडित महिला एका एनजीओमध्ये काम करते. याच महिलेने बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलेल्या जुबैर खानची मदत केली होती. जुबैरने यापूर्वीच सलमान विरुद्ध खटला दाखल केला आहे. महिलेने लावलेल्या आरोपानुसार, शेराने महिलेला जुबैरची मदत करू नये अशी तंबी दिली होती. तिने ऐकण्यास नकार दिला, तेव्हा सलमानच्या बॉडिगार्डने कथितरीत्या तिला बलात्काराची धमकी दिली. खार पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी एफआयर दाखल करण्यात आला आहे. 
 
 
महिलेची तक्रार काय?
>> एफआयआर दाखल करणारी महिला एका एनजीओमध्ये काम करते. नुकतेच बिग बॉसमधून बाहेर काढलेला सदस्य जुबैरने सलमान विरोधात गैरवर्तनाचे आरोप लावताना सलमानविरुद्ध खटला दाखल केला. याच जुबैरची संबंधित महिला मदत करत होती. 
>> महिलेने लावलेल्या आरोपानुसार, गुरमीत सिंह जॉली उर्फ शेराने तिला 20 ऑक्टोबर रोजी फोन केला होता. यात तू भाई (सलमान) ला त्रास का देतेस? जे काही प्रकरण आहे ते लवकरात लवकर मिटव असे म्हटले.  
>> शेराच्या म्हणण्याचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आपल्या एनजीओच्या मार्फत सत्य आणि कमकुवत लोकांची साथ जरूर देणार असे महिलेने म्हटले. यावरून शेरा महिलेवर भडकला. याचवेली शेराने कथितरीत्या संबंधित महिलेले बलात्काराची धमकी दिली. 
>> महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिने शेराचा कॉल रेकॉर्ड केला आहे. तसेच या फोनची ऑडिओ क्लिप पोलिसांना पुरावा म्हणून दिली आहे. शेरा विरोधात भारतीय दंड विधानाची कलम 509 नुसार खटला दाखल करण्यात आला आहे.
 
 
20 वर्षांपासून सलमानसोबत राहतो शेरा
>> गुरमीत सिंह जॉली नाव असले तरीही सलमानच्या सर्वात विश्वासू बॉडिगार्डला शेरा म्हणूनच ओळखल्या जातो. सलमानसाठी शेरा त्याच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. 
>> सलमान जेथे जातो तेथे एका दिवसापूर्वीच आढावा घेण्यासाठी शेरा पोहोचतो. बॉडी बिल्डिंगमध्ये शेरा जुनियर मिस्टर मुंबई आणि जुनियर मिस्टर महाराष्ट्र जिंकलेला आहे. 
>> शेरा स्वतः सलमानची एक मित्र म्हणून काळजी घेतो. मुंबईत तो सलमानच्या घराच्या अगदी शेजारीच राहतो. 
>> सलमानच्या सांगण्यावरूनच त्याने इवेंट मॅनेजमेंट कंपनी विझक्राफ्ट आणि ‘टायगर सिक्यॉरिटी’ अशा कंपन्या देखील स्थापित केल्या आहेत. या कंपनीच्या माध्यमातून तो दुसऱ्यांनाही कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरवतो.
बातम्या आणखी आहेत...