आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकाचा तरूणीवर बलात्कार, NCP च्या या जोडप्याने केली मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नगरसेवक दया गायकवाड - Divya Marathi
भाजप नगरसेवक दया गायकवाड
मुंबई- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजपचा नगरसेवक दया गायकवाड याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाडविरोधात एका अविवाहित तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस स्टेशनमध्ये दया गायकवाड यांच्यासह अश्विनी धुमाळ आणि मनोज धुमाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर या तिन्ही आरोपींनी फोन बंद केले असून ते फरार झाले आहेत. दया गायकवाड हा शिक्षण मंडळाचा माजी सभापती सुद्धा राहिला आहे.
 
याबाबतची माहिती अशी की, दया गायकवाडने एका तरूणीला फेसबुकच्या माध्यमातून जाळ्यात ओढले. यानंतर फ्रेंडशिप व पुढे लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, तरूणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला शिवीगाळ केली. तसेच गायकवाड विवाहित असल्याचे समोर आले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकर्ती असलेल्या अश्विनी धुमाळ व तिचा पती मनोज धुमाळ यांनी दया गायकवाडला साथ दिल्याचे तरूणीचे म्हणणे आहे.
 
यानंतर तरूणीने पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यानंतर एका मध्यस्थामार्फत तिला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न गायकवाड याने केला. तसेच संबंधित तरूणीला तुला संपवून टाकीन अशी धमकी दिली. मात्र, तरूणीने त्याबाबतचे संभाषण पोलिसांना दिले. यानंतर पोलिसांनी आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचे कळताच दया गायकवाड फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेत गायकवाडला साथ देणा-या जोडप्याचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...