मुंबई- आयपीएलमध्ये परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) उल्लंघन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलीवूड सुपरस्टार आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सहमालक शाहरुख खान, पत्नी गौरी खान आणि जुही चावलाला नोटीस बजावली आहे. शाहरुख खानला २३ जुलैला वैयक्तिकपणे ईडीच्या कार्यालयात हजर होण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कोलकाता नाइट रायडर्स स्पोर्ट््स प्रायव्हेट लिमिटेडकडून काही शेअर्सची विदेशी कंपनीला कमी किमतीत विक्री केल्याप्रकरणी ही नोटीस जारी झाली. कंपनीने काही शेअर्स मॉरिशसच्या एका फर्मला वास्तविक मूल्यापेक्षा कमी किमतीत विकण्यासाठी जारी केले होते. यामुळे सरकारी तिजोरीला ७३.६ कोटींच्या परकीय चलनाचे नुकसान झाले.