आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नॅपडील सीईओविरुद्ध एफआयआर, अामीर खानचीही चौकशी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलचे सीईओ कुणाल बहल व संचालकांविरुद्ध महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कंपनीवर प्रिसक्रिप्शन लागणाऱ्या औषधी ऑनलाइन विकल्याचा आरोप आहे. प्रिसक्रिप्शन औषधींसाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. औषधी वितरकांिवरुद्धही मुंबईच्या पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे अन्न व औषधी प्रशासनाच्या तक्रारीवर हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिली. कंपनीने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, स्नॅपडीलची चौकशी करण्यासाठी विशेष टीम बनवण्यात आल्या आहेत. फ्लीपकार्ट, अमेझॉनसह अन्य ई-कॉमर्स कंपन्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. कांबळे यांनी सांिगतले की, स्नॅपडीलवर एकूण ४५ आैषधांची विक्री करण्यात येत आहे. यामध्ये व्हिगोरा टॅबलेट आणि एस्कोरिल कफ सीरप यांचा समावेश आहे. यांच्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक आहे. जॅस्पर इन्फोटेक कंपनीने देशभरातील वितरकांशी आैषध वितरणासाठी करार केला आहे. त्यासाठी महाराष्ट्र एफडीएने संबंधित राज्यातील औषध नियंत्रकांना पत्र लिहिले आहे. एफडीएने १६ आणि २० एप्रिल रोजी याचप्रकरणी कंपनीच्या परिसरात धाडी टाकल्या होत्या. तेव्हा स्नॅपडीलने या औषधांची विक्री बंद करण्यात येत असल्याचे सांिगतले होते. त्यानंतर एफडीएने आपल्या टीमला ऑनलाइन औषध खरेदी करण्याचे सांिगतले होते. २४ एप्रिलला त्यांना आयपीएल आणि अनवॉटेंड-७२ पाठवण्यात आली.
स्नॅपडीलचे स्पष्टीकरण
कंपनीने म्हटले आहे की, ते चौकशीत एफडीएच्या टीमची मदत करत आहेत. औषधांची विक्री बंद करण्यात आली आहे. औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांचे देणी चुकवणे बंद करण्यात आले आहे.

परवानाधारक व्यक्तीच करु शकतो विक्री
कायद्यानुसार परवानाधारक व्यक्तीच औषध विक्री करू शकतो. औषधांच्या दुकानासाठीही काही नियम आहेत. कांबळे यांनी सांिगतले की, अशा प्रकारच्या औषधांची विक्री करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. आपल्या मनाने औषध घेणे हानिकारक होऊ शकते.
िशक्षेची तरतूद : तीन ते पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. एक लाखापर्यंत दंडही होऊ शकतो.

अामीर खानचीही चौकशी ?
स्नॅपडीलचे ब्रँड अॅम्बेसेडर चित्रपट अभिनेता आमीर खान आहे. त्याच्या चौकशीविषयी विचारले असता कांबळे यांनी सांिगतले की, सध्या त्याची काही गरज नाही. मात्र, पुढे त्यांची चौकशी होणार नाही, असे आपण म्हणू शकत नाही. यापूर्वीही गोविंदाच्या संधी सुधा हर्बल तेलाच्या जाहिरातीवर एफडीएने आक्षेप घेतला होता. त्यानंतर गोविंदाने त्याची जाहिरात करणे बंद केले होते.

यापूर्वीही झाली आहे कारवाई : महाराष्ट्र एफडीएने केमिस्ट ऑनलाइन डॉट इनवर बंदी लादली आहे.
गुजरातच्या एफडीसीएने मार्चमध्ये सुरतच्या प्रोव्हाइजर फार्माचा परवाना रद्द केला.