आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Fir Agianest Jiendra Awhad & 75 Farmers In Thane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जितेंद्र आव्हाड व शेतक-यांकडून बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड, गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्यासह सुमारे 75 शेतक-यांविरोधात एका बिल्डरच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ठाणे येथील खारेगाव परिसरातील शेतक-यांच्या जमिनींना योग्य भाव द्यावा नाहीतर त्या परत कराव्यात अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे. या संदर्भात ते शेतक-यांना घेऊन सोनावली ब्रदर्स यांच्या मॅरेथॉन बिल्डर्सच्या कार्यालयात जाऊन निदर्शने केली. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत शेतकरी व आव्हाडांनी तेथील कार्यालयातील संगणक संच, सीसीटीव्ही कॅमेरे, खुर्च्या व इतर साहित्यांची तोडफोड केली.
यानंतर सोनवली यांनी जितेंद्र आव्हाड आणि 75 शेतक-यांच्या विरोधात कळवा पोलिसांत तक्रार दाखल केली. यातक्रारीनंतर कळवा पोलिसांनी दंगल माजवणे, खासगी मालमत्तेचं नुकसान करणे, धमकावणे आदी नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, आव्हाड यांनी आपण कोणतेही दंगल घडविली नाही. तसेच आपण शेतक-यांच्या न्यायासाठी निदर्शने करीत आहोत. तसेच शेतक-यांना न्याय मिळत नाही तोपर्यत आपला लढा सुरुच राहील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.