आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधुदुर्गात मत्स्य आयुक्तांवर मासे फेकल्याप्रकरणी नितेश राणेंविरोधात एफआयआर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मत्स्य आयुक्त कार्यालयात काँग्रेस आमदार नितेश राणे. - Divya Marathi
मत्स्य आयुक्त कार्यालयात काँग्रेस आमदार नितेश राणे.
मुंबई- सिंधुदुर्गात मत्स्य आयुक्तांवर मासे फेकल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अतिरिक्त मत्स्य आयुक्तांनी एफआयआर दाखल केला आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याकडून या प्रकरणाचे समर्थन करण्यात आले आहे.
 
 
नितेश राणेंनी केले आपल्या कृतीचे समर्थन 
अधिकाऱ्याला मासा फेकून मारल्याचा मला पश्चाताप नाही, मच्छिमारांच्या प्रश्नांवर मी हसत हसत तुरुंगात जायला मी तयार आहे.’ असे म्हणत काँग्रेस आमदार नितेश राणेंनी आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. केसरकर फक्त सिधुदुर्गाचे गृहमंत्री आहेत. राणेंचा विषय आला का तात्काळ कारवाई केली जाते. असा आरोपही त्यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केला. माझ्यावर कारवाई करून शिवसेना मच्छिमारांचा आवाज दबण्याचा प्रयत्न करत आहे. पण आता तसे होणार नाही. कारण आता मच्छीमार पेटून उठेल. असेही नितेश राणे म्हणाले.
 
नेमके काय घडले
नितेश राणे हे मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी जिल्हा कार्यालयात येथे गेले होते. आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना नितेश राणेंनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली फेकली. तुम्ही तुमची कामे नीट करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, पैसे खाता, त्यामुळेच आम्हाला इथे यावे लागले, असे सुनावत नितेश राणे यांनी अधिकाऱ्याचे चांगलेच कान उपटले होते.
बातम्या आणखी आहेत...