आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुकेश अंबानी यांच्या \'अँटिलिया\'ला आग; सहाव्या मजल्याची आग विझविण्यात जवानांना यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण मुंबईत अँटिलिया ही 27 मजली इमारत आहे. - Divya Marathi
दक्षिण मुंबईत अँटिलिया ही 27 मजली इमारत आहे.
मुंबई- प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या आलिशान 'अँटिलिया' इमारतीला सोमवारी रात्री नऊच्या सुमारास लागलेली आग विझविण्यात यश आले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
अग्निशमन दलाच्या सहा गाडयांनी आणली आग आटोक्यात 
अग्निशमन दलाच्या सहा गाडयांनी ही आग आटोक्यात आणली. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असलेल्या मुकेश अंबानी यांची अँटिलिया ही 27 मजली इमारत दक्षिण मुंबईत आहे. 4 लाख चौरस फुटांवर असलेली ही इमारत 570 फूट उंच आहे. या इमारतीची किंमत 100 कोटी रुपये एवढी आहे. 8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला, तरी ही इमारत हलणार नाही, असा दावा केला जातो. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर पार्किग असून त्यात 168 गाडया बसतात. 
बातम्या आणखी आहेत...