आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fire At Central Railway Resident Park At Mumbai, Trackmen Dead

मुंबई: सेंट्रल रेल्वे कर्मचारी वसाहतीत आग, लोकलच्या धडकेने ट्रॅकमनचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे कर्मचारी वसाहतीला आज दुपारी आग लागली. ही वसाहत मराठा मंदिर सिनेमाच्या मागे असून, 15 मजल्यांच्या या इमारतीत चौथ्या मजल्यावर आग लागली आहे. या आगीत 8-10 रहिवासी जखमी झाल्याची माहिती आहे. या इमारतीतील 60-70 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते. आगीचे कारण समजू शकले नाही, सुमारे तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले.
अग्निशमन दलाच्या 14 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. या इमारतीत वेस्टर्न रेल्वेचे कर्मचारी राहत असल्याचे पुढे आले आहे.
लोकलची धडक बसून ट्रॅकमनचा मृत्यू- मध्य रेल्वेवर ठाणे ते मुलुंड स्टेशनांदरम्यान आज लोकल रेल्वेची धडक बसून एका ट्रॅकमॅनचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर संतापलेल्या इतर रेल्वे कर्मचा-यांनी रेल रोको केले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वेतील ट्रॅकमन, गँगमनच्या सुरक्षेचा प्रश्न गेली अनेक वर्षं प्रलंबित आहे. याकडे लक्ष देण्याची वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच असे अपघात होत असल्याचे सांगत या कर्मचा-यांनी आंदोलन केले.